Dahigaon: Discover Extra Income with Amazon CFDFXRD-LiveLearn Moreडबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे दहा एकर परिसरातील माळारानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या.ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर,सोलापूर,पुणे,सातारा,मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे २०० बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या शर्यतीनंतर चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीनं मैदान मारत थार गाडी पटकावली. या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.